खेळातून जिद्द व चिकाटीसोबतच व्यक्तिमत्व विकासाला मिळते चालना : भाग्यश्री आत्राम

83

– किष्टापूर (वेल) येथे टेनिस क्रिकेट बॉल सामन्यांचे उद्घाटन

गडचिरोली : खेळातून जिद्द व चिकाटीसोबतच व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. 21 नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील वेलगुर नजीकच्या किष्टापूर (वेल) येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. या कार्ययक्रमाच्या अध्यक्षस्थानी किष्टापूर ग्रामपंचायतीचे सरपंच नंदु तेलामी तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच पवन आत्राम, वेलगुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कुसुम दुद्दीवार, सुरेखा सडमेक, आदिल पठाण, लक्ष्मण येरावार, तोटावार, श्रीनिवास विरगोनवार, विशेष भटपल्लीवार, संतोष तोरे, वामन मडावी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनीय स्थानावरून पुढे बोलताना माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम म्हणाल्या की, शिक्षण, क्रीडा व कला क्षेत्रातून व्यक्तिमत्व विकास होतो व खास करून क्रीडामुळे युवकांमध्ये खिलाडीवृत्ती येते. त्यामुळे युवकांनी शिक्षणासोबतच खेळात अधिक आवड आणि रुची दाखवून आपली चमकदारी दाखवावी, असे भाग्यश्रीताई आत्राम म्हणाल्या. सर्वप्रथम फित कापून व फलंदाजीत फटका मारून क्रिकेट सामन्यांचे शानदार उद्घाटन माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. प्रास्ताविक व संचालन संजय गुरूूनुले यांनी केले. यावेळी जय सेवा युवा क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अजित आत्राम, उपाध्यक्ष प्रशांत सडमेक, सचिव मनीष मडावी, सहसचिव हरिश नैताम,  विजय आत्राम, मोहन आत्राम, कैलास, प्रशांत सडमेक, सुनील सडमेक, नितेश कुमरे आदी आणि खेळाडू, प्रेक्षक व असंख्य युवक उपस्थित होते. किष्टापूर (वेल) येथील क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्यातर्फे पंधरा हजार एक, द्वितीय राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांच्यातर्फे अकरा हजार एक तर तृतीय पारितोषिक कीष्टापूर ग्राम पंचायतीच्या वतीने सात हजार एक रु. रोख रक्कम असे विविध आणि वैयक्तिक पुरस्कार ठेवण्यात आले आहे.