भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांनी केली धान पिकांची पाहणी

89

– शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

गडचिरोली : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी भाजपाचे गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगर परिषदेचे पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती मुक्तेश्वर काटवे यांनी शेतात जाऊन केली. यावेळी त्यांच्या सोबत शेतकरी बांधव व कृषी सहाय्यक उपस्थित होते. अवकाळी पावसाचे पाणी शेेेतात कापून ठेवलेल्या धानाच्या सरड्यांमध्ये साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच शेतात उभ्या असलेल्या कापणीयोग्य धान पिकात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांनी केली आहे.