वसा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळा निमित्ताने काढली पालखी

119

गडचिरोली : आज गुरुदेव सेवा मंडळ वसा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळा निमित्ताने पालखीचे पुजन करुन पालखीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंंगी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथजी कुंभारे, पं. स. सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास केशवराव दशमुखे, सरपंच मुखरुजी झोडगे, राम पा. भुसारी, फाल्गुजी निशाने, पंडीतराव पुडके, पोलिस पाटील मुरारी दहीकर, जनाधँनजी धानोरकर, नरहरी हरडे, मंगलाबाई धानोरकर आदी उपस्थितीत होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांंच्या हस्ते पालखीचे पुजन करुन पालखी गावातून फिरवण्यात आली. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी पालखीचे पूजन केले.