स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

140

– पोटेगाव आश्रमशाळेत सांस्कृतिक कलागुणांची उधळण
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी कलागुणांची उधळण केली.
आश्रमशाळेत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्याचप्रमाणे पारंपारिक नृत्य स्पर्धा, गोंडी गीत गायन स्पर्धा तसेच स्वातंत्र्यानंतर आदिवासी समाजाचा विकास झाला की नाही? या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा पार पडल्या. शाळेतील जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम व स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक शिक्षक डॉ. एस. डी. गोट्टमवार, प्रमिला दहागावकर, जेष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसू, व्ही. एम. नैताम,अधीक्षिका एल. आर. शंभरकर, व्ही. के. नैताम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
हे ठरले विजेते
पारंपारिक नृत्य स्पर्धेत इयत्ता 10 च्या विद्यार्थिनीच्या चमूने प्रथम क्रमांक पटकाविला यात अनिता नरोटे, पूजा उसेंडी, पल्लवी मट्टामी, करिश्मा आतला, शीतल मडावी, क्रिष्टी एक्का, सपना परसा, करिश्मा गोटा या विद्यार्थिनींचा समावेश आहे. इयत्ता 8 च्या विधर्थिनीने द्वितीय तर 9 च्या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला. गोंडी गीत गायन स्पर्धेत इयत्ता 10 च्या विद्यार्थिनी अनिता नरोटे, पूजा उसेंडी, पल्लवी मट्टामी, करिश्मा आतला या विद्यार्थिनीच्या सामूहिक गोंडी गीताला प्रथम क्रमांक मिळाला. इयत्ता 9वी ला द्वितीय तर तृतीय क्रमांक 10वी च्याच मुलीने पटकाविला .निबंध स्पर्धेमध्ये 9 च्या वनश्री कुमरे हिने प्रथम, शिवानी पोटावी द्वितीय तर तृतीय क्रमांक इयत्ता 10 ची भारती गावडे हिने प्राप्त केले.वादविवाद स्पर्धेमध्ये इयत्ता 9 ची विद्यार्थिनी शिवाणी पोटावी हिने प्रथम, वनश्री कुमरे द्वितीय तर इयत्ता 10 चा भास्कर नरोटे याने तृतीय क्रमांक पटकाविला.