बांग्लादेशाच्या निर्मितीत श्रीमती इंदिरा गांधी यांचा सिंहाचा वाटा : डॉ. प्रमोद साळवे

196

– डॉ. साळवे नर्सिंग काॅलेजमध्ये इंदिरा गांधी जयंती साजरी
गडचिरोली : श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात भारत हा जगातील बलाढ्य व प्रगतीशील देश म्हणून मान्यता पावलेला होता. बांग्लादेशाची निर्मिती करण्यात इंदिरा गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन डॉ. नर्सिंग काॅलेजचे अध्यक्ष व प्रदेश काॅंंग्रेस डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी केले. डॉ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगाव येथे भारताच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शिनी श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. साळवे पुढे म्हणाले की, भारताच्या प्रगतीत त्यांचे सर्वात मोठे योगदान असून भारताची कृषी, विज्ञान व बॅंकांच्या विलगीकरणाच्या निर्णयामुळे भारताची संपूर्ण जगात मान उंचावल्या गेली. त्यांच्या खंबीर व परिपक्व नेतृत्वामुळे त्यांनी रणरागिणीचे रुप घेऊन पाकिस्तानचे दोन तुकडे करून त्यांचे कंबरडे मोडले ही त्यांची सवात मोठी उपलब्धी आहे. त्यांच्या करारी नेतृत्वामुळेच अमेरिकेचे सातवे आरमार भारतापर्यंत पोहचू शकले नाही. परंतु आज भारताचे दुर्दैव असे की असा दैदिप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी तंमुस दुधमाळाचे अध्यक्ष अनिल मेश्राम, संस्थेचे ट्युटर श्रीमती नवमी बडगे, मयुरी विरखरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन निकिता सडमेक हिने केले. प्रास्ताविक स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा साक्षी कुमरे तर आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष अबोली त्रिसुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल पदा, वनश्री दाजगाये, व्टिंकल सयाम, श्रद्धा सलाम, अमिशा पेटकर, साक्षी मडावी, पायल मडावी, पूजा भांडेकर, शीतल हुमणे,रविना फुलकवर, ईश्वरी कावळे, कोमल टेकाम, अपना तुलावी, मालती सिकंदर, संध्या लोहबळे, पूजा रामटेके, पूनम वट्टी, प्राची नंदेश्वर, मयुरी गडपायले, शुभांगी गेडाम, प्राजिली येरमे, अंजली चंदागडे, पायल सिडाम, विभा निकुरे, सेजल सोनके, पल्लवी बोरकर, प्रणाली तुलावी, रेश्मा मटामी, प्रतिक्षा कुलयेटी, वैष्णवी साखरे, अजय चांग आदींनी सहकार्य केले.