१८ ला खा. शरद पवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार

257

– देसाईगंज येथे मेळाव्याचे आयोजन, गडचिरोली येथेही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे १८ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात देसाईगंज येथील मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते गडचिरोली येथे आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. खा. पवार यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जय्यत तयारी सुरू असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह संचारला आहे.