शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी गिलगाव येथे वस्त्रदान कार्यक्रम

101

– शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे उपजिल्हा प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचे आवाहन

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुुुधवार, 17 नोव्हेंबर 2021 ला दुपारी 4 वाजता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली तालुक्यातील गिलगाव (बाजार) येथे वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व आजी – माजी पदाधिकारी व शिवसैनिकांंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना गडचिरोली उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले आहे.