क्रांतिसूर्य बिरसा मुंडा हे समाजाचे उदारकर्ते – माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी

120

– दिभना येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

गडचिरोली : संपूर्ण भारतातील बहुजन समाजाचे प्रेरणास्थान भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महानायक धरती आबा समाज सुधारक देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी बांधवाना संघटित करून इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणारे आदिवासी योद्धा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४६ व्या जयंती निमित्य गडचिरोली तालुक्यातील दिभना येथे आदिवासी बिरसा मुंडा समिती दिभनातर्फे बिरसा मुंडा जयंतीचे १५ नोव्हेंबर सोमवारला आयोजन करण्यात आले होते. दिभना येथील नागरिकांनी, युवा वर्गाने गावामध्ये रॅली काढून, आदिवासी वेशभूषा, आदिवासी रेला नृत्य सादर करून, महानवन वीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी सांगितले की, बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार, छोटा नागपूर येथे झाला. भारतीय स्वातंत्र्य युध्दात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या लढयात कित्येकानी आपल्या प्राणाचे बलिदान केले, क्रांतिवीर ९ जून १९०० ला जगाचा शेवटचा निरोप घेतले, असे डॉ. नामदेवराव उसेंडी बोलताना व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी देखील भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष रोहिदास राऊत, अध्यक्ष बहुजन अधिकारी महासंघ डॉ. नामदेव खोब्रागडे, माजी.जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी हसनभाई गिलानी, शालीकराम उईके, वासुदेव शेडमाके, सरपंच दिभना जीवन मेश्राम, रमेश गुरनुले, योगेश पा. जेगठे, आदिवासी समाज कार्यकर्ते वसंत कुळसंगे, मुकुंद उंदिरवाडे, रोहित सप्रे, वनरक्षक अन्नपूर्णा सिडाम, उपसरपंच ग्रा.पं. दिभना उषाताई चौधरी, सदस्य धनराज जेगठे, सदस्य चंदाताई जेगठे, सदस्य ज्योतिताई नैताम, मा.सरपंच खरपुंडी आनंदराव नैताम, दिलीप नांदेश्वर, समस्त गावकरी मंडळी व आदिवासी बिरसा मुंडा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हिमेन्द्र मेश्राम यांनी केले तर आभार कुळसंगे यांनी मानले.