भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य प्रेरणादायी – खा. अशोक नेते

115

– आरमोरी तालुक्यातील कासवी येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम

गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्य काळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळ उभी केली व आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी देशासाठी केलेले कार्य अविस्मरणीय असून त्यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. आरमोरी तालुक्यातील कासवी येथे आदिवासी गोंड समाज संघटना कासवीच्या वतीने आयोजित आदिवासी गौरव दिन व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, आरमोरी नगर परिषदेचे बांधकाम सभापती भारत बावनथळे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, कासवीचे सरपंच सतीश गुरनुले, उपसरपंच प्रवीण ठेंगरी, संघटनेचे आसाराम प्रधान, उदाराम दिघोरे, माजी सरपंच भारत वाटगुरे, रूमदेव सहारे, कल्याणदास कानतोडे, शेषराव कुमरे, हिरालाल कानतोडे, कांशीराम सयाम उपस्थित होते. यावेळी आ. कृष्णाजी गजबे यांनी आदिवासी समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात शहीद वीर बाबुराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा, वीरमाता राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणने करण्यात आली. कार्यक्रमात आदिवासी बांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.