अवकाळी पावसामुळे शेतपिकांंचे झालेल्या नुकसानीचे सर्व्हे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी

221

– काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांंकडे मागणी

गडचिरोली : धान व इतर पीक हातात येत असतानाच 13 व 14 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धान पिकाचे अहोरात्र मेहनत करून शेतकऱ्यांनी पीक घेतले. परंतु अवकाळी झालेल्या पावसाच्या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून या अकाली पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात सम्पूर्ण काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे करण्यात आली. यावेळी गडचिरोली जिल्हानिरीक्षक तथा महासचिव म.प्र.का.क. डॉ. नामदेवराव किरसान, माजी आमदार तथा महासचिव म.प्र.का.क. डॉ.नामदेवराव उसेंडी, म.प्र.का सचिव डॉ. नितीन कोडवते, म.प्र.का. महासचिव डॉ. चंदाताई कोडवते, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, हसनभाई गिलानी, शंकरराव सालोटकर, प्रभाकरराव वासेकर, समशेरखा पठाण, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग वासेकर, पंडितराव पुडके, ता. का. अध्यक्ष नेताजी गावतुरे, नंदूजी वाईलकर, बाळासाहेब आखाडे, नगरसेवक रमेश चौधरी, सुनिल चटगुलवार, अरुण पा. मुनघाटे, अनिल कोठारे, नंदू कायरकर, प्रभाकर कुबडे, जितेंद्र मुनघाटे, आशिष कामडी, घनश्याम वाढई, असंघटित कामगार सेल अध्यक्ष मिलिंद बागे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, दिवाकर निसार, नरेंद्र डोंगरे, बाळू मडावी, प्रतीक बारसिंगे,घनश्याम वाढई, विपुल एलट्टीवार, हरबाजी मोरे, वसंत राऊत, मधुकर नैताम, भास्कर नरुले, शंकर डोंगरे, नीता वडेट्टीवार, मेश्राम ताई, आदी शेकडो काँग्रेस कार्यक्रते यावेळी उपस्थित होते.