खासदार अशोकजी नेते यांनी सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) येथे सहानुभूतीपूर्वक सांत्वनपर भेट देऊन केली आर्थिक मदत

48

विदर्भ क्रांती न्यूज

सिंदेवाही : तालुक्यातील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा कार्यक्रम निमित्ताने मान. खासदार अशोकजी नेते यांना तालुकाध्यक्ष राजेंद्रजी पा. बोरकर यांनी चारगाव (बडगे) येथील सोनाली चेतन मसराम वय २२ वर्ष हि शेतशिवारातील पाऱ्याचे गवत कापत असताना अचानक पट्टेदार वाघाने हल्ला करून तिला जखमी केलेे.
या घटने संदर्भातील माहिती मान. खा.अशोकजी नेते यांना दिली असता या संबंधी दखल घेऊन चारगाव (बडगे) येथे जाऊन त्या कुटुंबीयांचं सांत्वन करून यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. तसेच काही अडीअडचणी आल्यास आम्ही आहो, असे याप्रसंगी खा. अशोकजी नेते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसेच शिवनी येथील भाजपाचे कार्यकर्ते माजी उपसरपंच स्व. नामदेव काशिनाथ गहाणे हे अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याची घटना कळल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

वासेरा येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामाबाबत घेतला आढावा

याप्रसंगी मान. खा. अशोकजी नेते, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा, मा. प्रा. अतुलभाऊ देशकर माजी आम. ब्रम्हपुरी,तालुकाध्यक्ष मा. राजेंद्र पा. बोरकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, माजी सभापती नागराजजी गेडाम, यु. मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा माजी पं. स.सदस्य रितेशजी अलमस्त, अरविंद राऊत माजी सभापती, कैलासजी कुमरे महामंत्री अनु.ज.भा. अस्मिता कवठे सरपंचा चारगांव (बडगे), राम कवठे, प्रभाकर मोहूरले, सरपंचा पोर्णिमा चौके शिवनी, चेतन गहाणे, राकेश नागापुरे, महेश बोरकर सरपंच वासेरा, उपसरपंचा मंदा मुनघाटे, रविंद्र बोरकर, तलांडे पो.पा.दतघाटे, तसेच कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.