सिरोकोंडा ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामे सुरू ; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत सिरोकोंडा हद्दीतील सिरोकोंडा, गंगापूर येथे विविध विकास कामे सुरु झाले असून सदर विकासकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना 15 वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर मधून 5 लाख रुपयांची निधी मंजूर करून ग्रामपंचायत सिरकोंडा हद्दीतील गंगाानूर येथे सुरेश मडावी यांचे घरासमोर जाणाऱ्या रस्त्यावर सीसी रोडची भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे गंगानूर गावातील अंतर्गत रस्त्याचा विकास होऊन रस्ते चिखलमुक्त होणार असल्याने गंगानूर गावातील नागरिक आनंद व्यक्त करत आहे.

यावेळी उपस्थित आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगाम,ग्रामपंचायत सिरोकोंडा सरपंच लक्ष्मण गावडे, मुल्ला गावडे, माजी जिल्हा परिषद सभापती जयसुधा बानय्या जनगाम, माजी सरपंच मासा गावडे, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे, माजी सरपंच बापू सडमेक, इरपा मडावी, विजय रेपालवार, बिचमय्या कुळमेथ, सचिव वाय. एम. कोरेटी, महेश दुर्गम, लक्ष्मण बोल्ले, साई मंदा, प्रमोद गोडसेलवारसह ग्रामपंचायत सिरकोंडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.