– जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : खा. अशोकजी नेते यांनी सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करून यशस्वीतेसाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सूचना या प्रसंगी खा. अशोकजी नेते यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोकजी नेते बोलताना आपला जिल्हा आदिवासी व अतिदुर्गम जिल्हा असून या जिल्हयात तळागाळापर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा जनतेपर्यंत पोहोचविणे वआरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्षणे देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
या शिबिरादरम्यान दंतरोग चिकित्सा व उपचार, डोळ्याची तपासणी, मोतीबिंदूचे ऑपरेशन, कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब,स्त्रीरोग तपासणी व उपचार व ईतर विविध आजारांचे निदान व उपचार या शिबिरा दरम्यान आयोजित करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत गोल्ड कार्ड ३ लाख ४८ हजार लोकांना लाभ दिला जाईल. आयुष्मान भारत पंधरवाडा या दिवसाचे औचित्य साधून या लाभार्थींना आयुष्मान भारत कार्डचे वितरण सुध्दा यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अनिल रुडे, कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा याप्रसंगी मार्गदर्शक केले. यावेळी मान. खा. अशोकजी नेते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धवल साळवे डॉ. सतीशजी सोळंके, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, आशिष पिपरे नगरसेवक चामोशी, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी आघाडीचे अविनाश पाल, डेडूजी राऊत डॉ. माधुुरी किल्लनाके, डॉ. धुर्वे, स्वप्निल अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.