अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या वतीने एकता मूकबधिर विद्यालय येथे फळ व बिस्कीट वाटप

40

विदर्भ क्रांंती न्यूज

गडचिरोली : जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या औचित्याने दि. 25 सप्टेंबर रोजी स्थानिक मुडझा येथील एकता निवासी मूकबधिर विद्यालयातील मूकबधिर विद्यार्थी – विद्यार्थिनींंना फळे व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. सदर सामाजिक उपक्रम अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. विवेक मून यांच्या पुढाकारात व अखिल भारतीय फार्मासिस्ट असो.चे जिल्हा सचिव श्री. मयूर पेद्दीवार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. ग्रीष्मा विवेक मून, श्री. मुरलीधर पेद्दीवार, श्री. अभय मेश्राम, श्री. संजय चौधरी (मूकबधिर विद्यालय शिक्षक), तसेच चि. विकल्प व चि. संकल्प मून यांच्या प्रमुख उपस्थितीत फळ व बिस्कीट वाटप कार्यक्रम घेण्यात आला.