– उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, लोकमत वृत्तपत्र समुहाचे बोर्ड चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा, प्रसिद्ध उद्योजक नितीन खारा यांच्या हस्ते गौरव
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : लोकमत वृत्तपत्र समूहाने मध्य भारतातील समाजाच्या सर्वस्तरावरील आपआपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कर्तुत्वान व कर्तबगार अशा एकूण 52 व्यक्तींची लोकमत समूहाने “आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया” या अवॉर्ड साठी निवड केली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पिपरे दाम्पत्य इंजि. प्रमोदजी पिपरे व सौ. योगीताताई पिपरे यांची ‘आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया” या अवॉर्डसाठी निवड करण्यात आली. यामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील कर्तुत्वात व्यक्तींची यशोगाथा जीवन गौरव पुस्तिकेच्या माध्यमातून मांडलेली आहे.
नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉइंट रामदासपेठ येथे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, लोकमत वृत्तपत्र समुहाचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा, कॉ.पे.इं. लिमटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकमत टाइम्स “आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया” जीवन गौरव पुस्तिका (टेबल बुक) प्रकाशन व गौरव सोहळा संपन्न झाला. सौ. योगिताताई पिपरे गडचिरोली शहराच्या तत्कालीन नगराध्यक्ष असताना, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच तत्कालीन अर्थमंत्री व विद्यमान वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांचा निधी आणुन गडचिरोली शहराचा जो विकास गेल्या ३० वर्षांमध्ये झाला नव्हता तो त्यांनी ५ वर्षाच्या कार्यकाळात करून दाखवला.खास करून कोरोना काळामध्ये गरजूंना अन्नधान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप, सोबतच कोरोना काळात बाहेर गावाहून आलेल्या मजुरांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून देणे, वैद्यकिय सुविधा तसेच रुग्णांना भोजनदान आधी सामाजिक बांधिलकीचे कामे त्यांनी केले. यामध्ये माजी भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक व विद्यमान लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांचे सुद्धा भक्कम पाठबळ होते. या उल्लेखनिय कार्याची पावती म्हणून लोकमत समूहाने “आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया” अवॉर्डने सन्मानित केले.
गडचिरोलीच्या विकासाचे मिशन पुढे नेणारी जोडी म्हणून पिपरे दाम्पत्य भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, लोकमत समुह बोर्डचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा, प्रसिद्ध उदयोगपती नितीन खारा यांच्या हस्ते “आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया” चे शिल्ड, सन्मानचिन्ह व जीवन गौरव पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले. पिपरे दाम्पत्य यांचे लोकमत टाइम्स “आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया” अवार्ड मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व चाहत्या वर्गांनि शुभेच्छा देवून अभिनंदन केले.






