कॉम्प्लेक्स परिसरातील रोपवाटिकेत ठाण मांडून बसलेल्या वाघिणीला केले जेरबंद

90

– शर्तीच्या प्रयत्नानंतर वनविभागाला आले यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील काॅम्पलेक्स परिसरातील कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेत ठाण मांडून बसलेल्या वाघिणीला आज सायंकाळी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.


गडचिरोली- चंद्रपूर मार्गावरील काॅम्पलेक्स परिसरातील कृषी महाविद्यालयाकडून कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेकडे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास वाघिण रस्ता ओलांडून जाताना काही नागरिकांना दिसल्याने एकच खळबळ उडाली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरतात घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. लागलीच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आले. या वाघिणीला पकडण्यासाठी दुपारी पिंजरा बोलाविण्यात आला व चंद्रपूर येथून बचाव पथक दाखल झाले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वनविभागाने मोठ्या शिताफीने रोपवाटिकेत ठाण मांडून बसलेल्या वाघिणीला जेरबंद केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.