आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून ५०५४ निधी अंतर्गत ७१ कोटी ६२ लाख रुपयांची कामे मंजूर

59

– अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार

– विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केले आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे अभिनंदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ५०५४ निधी अंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ११ मुख्य रस्त्यांच्या कामांना ७१ कोटी ६२ लक्ष रुपयांची मंजुरी देऊन अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याने आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे आभार मानले आहे.

या रस्त्यांमध्ये साखेरा पुस्टोला पेंढरी छत्तीसगड बॉर्डर पर्यंत १० कोटी ३७ लक्ष, पेंढरी जारावंडी कसनसूर रस्ता ५ कोटी ७५ लक्ष, हरणघाट चामोर्शी घोट मुलचेरा रस्ता १५ कोटी, तळोधी आमगाव भाडभीडी रेगडी देवदा रस्ता ३ कोटी, चातगाव -कारवाफा – पोटेगाव – पावीमुरांडा – घोट मार्कंडा रस्ता ३ कोटी, मुधोली – लक्ष्मणपूर – येनापूर सुभाषग्राम रस्ता ५ कोटी, कुनघाडा -गिलगाव -पोटेगाव- पुस्टोला रस्ता ७ कोटी ५० लक्ष येडानुर – पावीमुरांडा रस्ता २ कोटी , ५० लक्ष, रावणपल्ली -नवरगाव- भेंडाळा रस्ता ५ कोटी पावीमुरांडा रावणपल्ली रस्ता ४ कोटी ५० लक्ष, भेंडाळा – बोरी- जयरामपूर- अनखोडा रस्ता १० कोटी अशी एकूण ७१ कोटी ६२ लक्ष रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. राज्य शासनाने या अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील या प्रमुख रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉक्टर देवराव देवडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे अभिनंदन केले आहे.