वीज पडून मृत्यू पावलेल्या स्वीटी सोमनकर हिच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत करा : आमदार डॉ. देवरावजी होळी

42

– अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

– पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून उचलला विधानसभेत मुद्दा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील ३-४ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये सातत्याने होणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ वारा, विजांचा कडकडाट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच मालेर माल येथील वीज पडून मृत्युमुखी पावलेल्या स्वीटी सोमनकर हिच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली.

स्वीटी बंडू सोमनकर ही मुलगी शाळा संपल्यानंतर मालेरमाल येथे आपल्याकडे घराकडे परत येत असताना अचानक तिच्यावरती वीज पडली. तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे शासनाने याची नोंद घेऊन तिच्या परिवाराला योग्य ते आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी उचलून धरली.