सिरोंचा येथील महिलांनी घेतली भाग्यश्रीताई आत्राम यांची भेट

25

– विविध विषयांवर केली चर्चा, भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले महिलांचे स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

सिरोंचा : तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील विविध प्रभागातील महिलांनी माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केले.

माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम नुकतेच सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यादरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांत उपस्थित होत्या.

दरम्यान, तालुका मुख्यालयातील विविध प्रभागातील महिलांनी भाग्यश्रीताई आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केले.विशेष म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती भाग्यश्रीताई आत्राम यांनी दिल्या. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध दाखले, आधार कार्ड सारखे महत्वाचे कागदपत्रांची गरज असून ज्यांच्याकडे अजूनही असे कागदपत्र, विविध कार्ड नसतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत राबविण्यात येत असलेल्या “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत सर्व दाखले आणि विविध प्रमाणपत्र अद्यावत करून घ्यावे त्यानंतर तालुक्यातील महिलांना विविध योजनांचा लाभ कसे देता येईल यासाठी एक महिला मेळावा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत सविस्तर चर्चा करून महिलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.नेहमी विविध समस्या घेऊन पुरुषवर्ग समोर येत असतात. मात्र, मोठ्या संख्येने महिलांनी पुढे आल्याने भाग्यश्रीताई आत्राम यांनी संपूर्ण महिलांचे शब्दसुमनाने स्वागत केले.नेहमी महिलांच्या पाठीशी खंभीरपणे उभं असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.