ग्यारापत्ती – कोटगुल जंगल परिसरात पोलीस – नक्षल चकमक

243

– ६ ते ८ नक्षली ठार झाल्याची शक्यता

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्यारापत्ती – कोटगुल जंगल परिसरात आज, १३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत ६ ते ८ नक्षली ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत माहिती पोलिस विभागाकडून येणे बाकी आहे. प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० जवान ग्यारापत्ती – कोटगुल जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेेेने गोळीबार केला. दरम्यान, या चकमकीत ६ ते ८ नक्षली ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात असून अजूनही जवानांकडून घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.