भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने केंद्रशासन पुरस्कृत योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा सत्कार

85

– मोदी सरकारच्या 8 व्या वर्षपूर्ती निमित्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली यांच्या वतीने आयोजित केलेल्या “सेवा, सुशासन व गरीब कल्यानाची आठ वर्षे” या अभियानाचे औचित्य साधून स्थानिक पत्रकार भवन येथे केंद्रशासन पुरस्कृत योजणांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा महिला आघाडी अध्यक्षा तथा माजी जि. प. अध्यक्षा सौ. योगीताताई भांडेकर होत्या. तर उद्घाटक म्हणुन भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, प्रशांतजी वाघरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, जेष्ठ कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे होते.
यावेळी पंतप्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना, मातृवंदना योजना, कामगार योजना, शौचालय योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना इत्यादी केंद्रशासन पुरस्कृत योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांनी केंद्रशासनाच्या योजनांंवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महिला आघाडी शहर महामंत्री वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका लताताई लाटकर, निता उंदीरवाडे, कोमल बारसागडे, पल्लवी बारापत्रे, माधुरी नैताम, जोस्ना गोरे, शीतल भांडेकर, रश्मी खरकाटे, जोत्स्ना मुरमुरवार, नयना रामटेके, प्रतिभा कांबळे व मोठ्या संख्येने महिला लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोषनी बानमारे यांनी केले.