7 जून रोजी आमगाव (म.), येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर व समाज प्रबोधन कार्यक्रम

33

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोरोना महामारी पासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, आवश्यक त्या वेळी गरजू व्यक्तीस रक्त पुरवठा होऊ शकत नाही त्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो अशी परिस्थिती उद्भवू नये याकरिता जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक युवा कार्यकर्ते अनुप कोहळे आणि त्यांचे सहकारी यांच्या नवीन संस्थेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी चामोर्शी तालुक्यातील आमगाव (म.) येथे दिनांक 7 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता शहीद बाबुराव शेडमाके माध्य.विद्यालयात,  *निशुल्क आरोग्य तपासणी (डोळे, BP, सुगर इ.) व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे *समाजप्रबोधनाचा* कार्यक्रम सुद्धा यावेळी आयोजीत करण्यात आलेला आहे.  आरोग्य तपासणी शिबिराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयातून तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून मोठ्या संख्येने नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अधिक माहिती करिता व  इच्छुक रक्तदात्यांनी अनुप कोहळे 9923815724/ 762086976, विनोद शेंगर, किशोर पोहणकर, रवी बोदलकर, गजानन कुनघाडकर, देवीदास कोहळे, आशिष कारडे, जितेश शेट्टीवार, संदीप कोपुलवार, सूरज चलाख, ताराचंद गव्हारे, यांच्याशी संपर्क करावे व मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अनुप कोहळे यांनी केले आहे.