विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज, ७ जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. खा. सुळे सकाळी ८ वाजता चंद्रपूरहून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता गडचिरोती येथे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित श्रवणयंत्र व दिव्यांग प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता हॉटेल लँडमार्क येथे यशवंतराव चव्हाण सेंटर व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या बैठकीला त्या संबोधित करणार आहेत.
दुपारी 1.30 वाजता आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी त्यांचा वेळ राखीव राहील. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर 3.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकत्यांशी चर्चा करतीत. संध्याकाळी ५ वाजता जिल्हा पोलिस मुख्यालयात पोलिस विभागामार्फत आयोजित विविध उपक्रमांच्या सादरीकरण कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. संध्याकाळी ६ वाजता महिला मेळाव्याला त्या संबोधित करणार आहेत.