धानाला बोनस ऐवजी शेती मशागतीसाठी एकरी दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे : माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेव उसेंडी

143

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानाला बोनस देण्याच्या योजनेत शेतकऱ्यांंपेक्षा मध्यस्थी व्यक्तींनाच अधिक लाभ मिळत होता. त्यामुळे धानाला बोनस देण्याऐवजी शेतीच्या पुर्व मशागतीसाठी शेतक-यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान स्वरुपात देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार तथा प्रदेश महासचिव काँग्रेस कमिटी डाॅ. नामदेव उसेंडी यांनी केली. या योजनेमुळे ख-या शेतकऱ्यांंना अनुदानाचा थेट लाभ मिळण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला. शिर्डी येथे भारतीय काॅग्रेस कमिटीच्या सुचनेनसुार दिनांक 1 जुन ते 2 जुन रोजी पर्यंत 2 दिवसीय नवसंकल्प कार्य’शाळा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नवसंकल्प शिबिरात विविध समित्याचे गठण करण्यात आले होते. त्यातील सामाजिक न्याय सक्षमीकरण गट समित्यामध्ये डाॅ. नामदेव उसेंडी यांची निवड करण्यात आली होती. शिबिरामध्ये डाॅ. नामदेव उसेंडी यांनी उपस्थित सर्व आमदार, राज्यमंत्री यांचेकडे धानाला बोनस ऐवजी शेती मशागतीसाठी एकरी दहा हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली.