धान खरेदी केंद्राची उत्पादक मर्यादा व शेतकऱ्यांची उद्दिष्ट वाढवून देण्यात खा. अशोकजी नेते यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना यश

149

– उन्‍हाळी धान खरेदीचे केंद्र सुरू करून धान उत्पादक शेतकऱ्यांना‍ उद्दिष्ट वाढविण्‍यासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नाला यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोदिया हे जिल्हे भात उत्पादक म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असते. यावर्षी खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने सदर शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. उपलब्ध असणारे पाण्याचे साधन वापरून त्यांनी उन्हाळी हंगामामध्ये धानाची लागवड केली आहे. त्यानुसार उन्हाळी हंगामामध्ये धानाचे उत्पादन लक्षणीय होण्याची शक्यता आहे.हे धान विकुन खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा या शेतकऱ्यांना आहे. परंतु यावर्षिचे मार्केटिंग फेडरेशनद्वारे निश्चित करण्यात आलेले धान खरेदीचे उद्दिष्ट अत्यल्प आहे. त्यामुळे सदर धान उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी खा. अशोकजी नेते यांनी केंद्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांचे धान उत्पादन वाढून सुद्धा राज्यसरकार‍ दरवर्षी जेवढे ऐकरी उत्पादन होते. तेवढीच मर्यादा दिल्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढून धान्य कुठे विकले जावे. या चिंतेत शेतकरी असून त्यासाठी शेतकऱ्याचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी मागणी केली होती. उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्‍ट वाढविण्‍यास केंद्रशासन शेतकऱ्यांच्या हिताचे नेहमी निर्णय घेऊन काम करीत आहे. त्यानुसार मागीलवर्षी राज्यशासन धान्य खरेदी 1.85 लाख टन एवढी होती. पण खा. अशोकजी नेते यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नाला यश येऊन राज्य सरकारला 2.75 लाख टन मर्यादा वाढवून दिल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.