महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी आपला विकास साधावा : कपिल हाटकर

104

विदर्भ क्रांती न्यूज

मुलचेरा : महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी आपला विकास साधावा, असे आवाहन मुलचेऱ्याचे तहसीलदार कपिल हाटकर यांनी तुमरगुंडा येथे आयोजीत स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोसत्ववानिमित्त आयोजित समाधान शिबिर कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून संवर्ग विकास अधिकारी मनोहर रामटेके, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जावेद शेख, नायब तहसीलदार राजेंद्र तलांडे, चुटुगुंत्याचे सरपंच साधना मडावी, कोठारीच्या सरपंच रोशनी कुसनाके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी विशाल कुरेकार उपस्थित होते. सदर शिबिरात जात प्रमाणपत्र 411, अधिवास प्रमानपत्र 63, संजय गांधी मंजुरी आदेश 3, संगणकीकृत वनहक्क सातबारे 25, हयात प्रमाणपत्र 260 असे एकूण 762 प्रमाणत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वतीने 800 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात पशुवैधकीय विभाग, कृषी विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, वनविभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभाग, उमेदच्या वतीने स्टॉल लावून विविध योजनची माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन लगामचे तलाठी रितेश चिदंमवार यांनी केले.