पंचवटी नगरातील नागरिकांना मुलभूत सुविधा तत्काळ पुरवा : मुख्याधिकारी यांना निवेदन

63

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील आयटीआय चौकालगत असलेल्या पंचवटी नगरात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. जवळजवळ वीस वर्षांपासून पंचवटीनगर वार्ड क्रमांक १४ येथील नाल्या, रस्ते, वीज, पाणी आधी समस्या जसेच्या तसे कायम आहेत. आतापर्यंत अनेक नगरसेवक या समस्या सोडविण्यात कमी पडले. सततच्या दिवाबत्ती अडचणीमुळे वॉर्डात अनेक लोकांकडे चोऱ्या होत असतात. तसेच नेहमी अंधारामुळे लगतच लागून असलेल्या नाल्यामुळे साप, विंचू यांचा सुद्धा नेहमीचाच त्रास झालेला आहे. यापूर्वी सुद्धा अनेक निवेदने नगरपरिषदेला पंचवटी नगरातील नागरिकांकडून देण्यात आले. मात्र अजिबात दुर्लक्ष केल्या जातो. म्हणून संतप्त नागरिकांनी थेट मुख्याधिकारी यांना यात लक्ष घालून तातडीने समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देत पंचवटी नगरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने निवेदनातून दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, अशोक खरवडे, वामन चौधरी, प्रणय खैरे, सुधाकर वाळवे, मंगेश डावे, पुरुषोत्तम कुळमेथे, धनराज पाटील, दिपक कोरेवार, के. एम. पुरकलवार, शामराव नेवारे, के. बी. कोल्हटवार, आर. टी. उंदिरवाडे, अक्षय खोब्रागडे, आशिष बोधलकर, एस. ए. मुळे, व्ही. पी. येनगंटीवार, प्रा. विवेक गोर्लावार, मनोहर दुस्सावार, नीलकंठ खोब्रागडे, हिरामण कोरेटी, दिनेश कुंटावार, राजेंद्र तलांडी, प्रभुदास मडावी, जोंधरूजी सोमनकर, देवीदास लांजेवार, पी. जी. जनगनवार, ओ. जी. बमनवार आदी वार्डातील नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी निवेदन देण्यात आले.