रेव्हेन्यू कॉलनीच्या ओपनस्पेसमधील अतिक्रमण हटविण्याची मागणी

135

– कॉलनी बाहेरच्या लोकांना हाताशी घेऊन जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गवरील महिला महाविद्यालया नजीकच्या रेव्हेन्यू कॉलनी परिसरात रामटेके डुप्लेक्स जवळील नगरपरिषदेच्या २५०० स्क्वेअर फूटच्या ओपनस्पेसवर अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी या वार्डातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. या संदर्भात तेथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अतिक्रमणामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल अवगत केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेचे २५०० स्वेअर फुटचे ओपनस्पेस आहे. त्या ओपनस्पेसवर अनुसूचित जातीच्या काही लोकांनी रस्त्यावर बुद्ध मूर्तीची स्थापना करून अतिक्रमण केले आहे. तेथील ९ मीटरचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. मागील काळात नगरपरिषदमध्ये नगरपरिषदेच्या जागेवर कोणतेही धार्मिक स्थळे किंवा पुतळे उभारण्यात येणार नाही असा ठराव पारित करण्यात आलेला होता. सदरची जागा नगरपरिषदेची असून त्याचा सातबारा सुद्धा आहे.

आ. डॉ. होळी आणि मुख्याधिकारी वाघ यांनी जागेची प्रत्यक्षात पाहणी केली आणि अतिक्रमण करणाऱ्यांची समजूत काढली तरी त्यांनी अजूनही अतिक्रमण काढलेले नाही. त्यासाठी वार्डातील सर्व नागरिकांनी एकमताने स्वाक्षरी अभियान राबवून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन अतिक्रमण हटवून त्या ओपन स्पेसचे सौंदर्यकरण करून रस्ता सर्वांसाठी मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. वार्डातील लोकांना कुठल्याच जाती धर्माचा विरोध नसून रितीरिवाजाप्रमाणे बुद्ध मूर्ती एका बाजूला करून इतर जागा सार्वजनिक करून रस्ता सर्वांसाठी मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली आहे . उल्लेखनीय आहे की कुठेही कोणत्याही देवी, देवता किंवा महापुरुष, राष्ट्रीय नेते, समाजातील प्रेरणादायी महानुभाव, संत, महात्मे किंवा अन्य कुणाचेही पुतळे, स्मारक, धार्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक स्थान ऊभारायचे असेल तर त्यासाठी देखभाल व इतर व्यवस्थापन करणारे व उचित – अनुचित घटनांची जबाबदारी घेणारे मंडळ धर्मादाय आयुक्ताकडे स्थापन करणे आवश्यक आहे. दुसरे की कोणतेही ओपन स्पेस हे संबंधित लेआऊटधारक दानपत्र करून देऊ शकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी नगर परिषद, पंचायत अथवा स्थानिक स्वराज्य संस्था जो निर्णय घेईल, त्यानुसार अशा जागांचा विकास केला जातो. त्यामुळे अतिक्रमण करून ठेवलेली मुर्ती ही बाब निश्चितच अवैध ठरते. म्हणून सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.