तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी तमाम अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करावे : आमदार डॉ. देवरावजी होळी

104

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली धानोरा येथे वार्षिक आमसभा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील पटांगणात गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली आज वार्षिक आमसभा संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने तहसीलदार वाकुडकर, संवर्ग विकास अधिकारी कोमेलवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, पं. स. सदस्य अजमनजी, पं. स. सदस्य नैनाताई कोवाची, भाजप तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड म्याडम, भाजप ज्येष्ठ नेते साईनाथजी साळवे, गजानन मेश्राम, नगरसेवक संजय कुंडू, गटशिक्षाधिकारी आरवेली
प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. होळी यांनी पंचायत समिती आमसभेत धानोरा तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या बाबत आढावा घेतला. यावेळी अनेक गावात विविध शासकीय योजना सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत
पोहचल्या नाही. अनेक गावातील रस्ते, नाल्या, पुलीया, घरकुल अपूर्ण अवस्थेत आहेत. अनेक अधिकारी कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे झाली नाही. अनेक गावातील समस्या जैसे थे आहेत. परंतु समस्या सुटले नाहीत याबाबत आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी खंत व्यक्त केली.
उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक, तलाठी, यांना धारेवर धरले व तंबी दिली. धानोरा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे निर्देश दिले. आजच्या या आमसभेत धानोरा तालुक्यातील समस्त ग्रामसेवक
व समस्त विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना आमदार डॉ. होळी यांनी मार्गदर्शन केले व गावच्या सक्षमीकरण करण्यासाठी समस्त नागरिकांनी पक्ष अंतर्गत वाद बाजूला सारून गावाच्या विकासासाठी एक होण्यासाठी जाहीर आवाहनकेले. यावेळी आजच्या कार्यक्रमाचे संचालन राजू वडपल्लीवार यांनी केले तर अहवाल वाचन स्मिता पुणेकर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती धानोरा येथील अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले.