डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इंदिरा गांधी चौकात उत्साहात साजरी

192

– ब्ल्यू स्टार गडचिरोलीच्या वतीने केले होते आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती ब्ल्यू स्टार गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात १०० किलोचा केक कापून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सामाजिक कार्यकर्ते सिताराम टेंभुर्णे यांच्या हस्ते करण्यात आले, तर १०० किलोचे केक ब्ल्यू स्टारचे मुख्य संयोजक बाळू टेंभुर्णे यांच्या हस्ते कापण्यात आले. यावेळी ब्ल्यू स्टारचे संयोजक जी. के. बारसिंगे, संयोजक योगेंद्र बांगरे, संयोजक मनोज टेंभुर्णे, संयोजक मालाताई भजगवळी, संयोजक अनिता मडावी, संयोजक किरण सहारे, संयोजक संदिप सहारे, संयोजक किशोर भैसारे, संयोजक विठोबा साखरे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
ब्ल्यू स्टार गडचिरोलीच्या वतीने पूर्वनियोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जयत्त तयारी करण्यात आली होती. इंदिरा गांधी चौक निळे झेंडे लावून निळ्या पताकांनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कटआऊट व श्लोगन लिहून लावण्यात आले होते. तसेच निळी रोषणाई करून फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेबांचे ५० फुटाचे कटआऊट व चौकातील संपूर्ण जयंती उत्सव बघण्यासाठी मोठी डिजीटल स्क्रीन हे विशेष आकर्षन होते. त्यामुळे चाहत्यांना मोठ्या कटआऊट सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नव्हता. संपूर्ण जयंती उत्सव कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह दाखविण्यात येत होते. त्यामुुळे डीजेवर थोरले मोठे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर गाण्यावर ठेका धरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत होते.
यावेळी गडचिरोलीकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा आगळावेगळा अनुभव घेतला. संध्याकाळपासूनच चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री संयोजक रितेश भैसारे, दादू ढवळे, रोहित टेंभुर्णे, श्रेयस भैसारे, समिर रामटेके, अनिरुद्ध टेंभुर्णे, गौरव शहा, स्वप्निल उंदिरवाडे, आदींंनी परिश्रम घेतले. आभार मालाताई भजगवली यांनी मानले.