विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : नारीशक्ती वंदन विधेयक हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला या विधेयकामुळे न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार असून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळणार आहे या विधेयकामुळे खरोखरच महिलांना खरा सन्मान मिळाला आहे.
याकरिता भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना धन्यवाद देण्याकरिता शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भव्य स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. तरी गडचिरोली शहरातील सर्व महिला भगिनींनी व सर्व नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेऊन मा. पंतप्रधान यांना धन्यवाद द्यावे, असे आवाहन भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष व नगरसेविका योगिताताई पिपरे यांनी केले आहे.






