विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरात ‘नारी शक्ती वंदन विधेयकाच्या’ समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रा रॅलीमध्ये उपस्थित राहून महिला शक्तीचा उत्साह अनुभवला. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना ३३% आरक्षण देऊन दिलेला सन्मान हा खऱ्याअर्थाने नव्या भारताच्या निर्मितीचा पाया आहे.
इंदिरा गांधी चौक येथून या रॅलीची उत्साहात सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत ही रॅली ‘कर्तव्य कक्ष’ (जनसंपर्क कार्यालय) पर्यंत करण्यात आली. यावेळी संपूर्ण गडचिरोली शहर ‘नारी शक्ती’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.
याप्रसांगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, गडचिरोली नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई निंबोरकर, देसाईगंज नगराध्यक्ष लताताई सुंदरकर, माजी जि. प. अध्यक्ष योगिताताई भांडेकर, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा योगिताताई पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्तुजी सूत्रपवार, गडचिरोली, आरमोरी, वडसा येथे सर्व नगरसेविका यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक विधेयकाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि रॅली यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या सर्व माता-भगिनींचे व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले आहे.





