राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 18 वर्षाखालील मुलांमुलींकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन

183

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे 14 मार्च रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील 18 वर्षाखालील मुला मुलींकरिता हृदयरोग, मेंदू मज्जारज्जू, आर्थोपेडिक तथा जनरल सर्जरी आदी रोगांबाबत तपासणी करण्यात आली. साधारणत: या शिबिरामध्ये 101 बाल रुग्ण सहभागी होऊन, आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. यामध्ये 14 रुग्ण वरील रोगांपैकी लक्षणे आढळून आलेल्या बाल रुग्णांवर सुपर मल्टीस्पेशालिटी एस. आर. सी. सी. हॉस्पिटल मुंबई येथे निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल. सर्वप्रथम सकाळी दहा वाजता मान्यवरांच्यया हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस आरोग्य सहायता कक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रमुख गजानन साबळे, डॉ. प्रिया प्रधान, रवींद्र वासेकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गडचिरोली, डॉ. सोलंकी निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, प्रकाश ताकसांडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली, शाहीन शेख महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली, विजय गोरडवार शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गडचिरोली, लीलाधर भरडकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गडचिरोली, डॉ. हेमराज मसराम जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँँग्रेस पार्टी डॉक्टर सेल, योगेश नांदगाये राष्ट्रवादी काँग्रेस आरोग्य सहाय्यता कक्ष जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, सोनाली पुण्यप्रेडिवार सचिव विदर्भ विभाग महिला राष्ट्रवादी पार्टी, डॉ. सतीश मेश्राम, डॉ. इंद्रजीत नागदेवते, आदी मान्यवरांची उपस्थितीमध्ये पार पडले, यानंतर रुग्णांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली. सदर शिबिराचे प्रास्ताविक विजय गोरडवार यांनी केले तर सूत्रसंचालन लीलाधर भरडकर यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नईम शेख, श्रीकांत भृगुवार, अमोल कुडमेथे, प्रसाद पवार, कपिल बागडे, विवेक ब्राह्मणवाडे, संजय कोचे, अजय कुकुडकर, अमर खंडाळे, सुनील कत्रजवार, नितीन पिपरे, नीता बोभाटे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्ष गडचिरोली, संध्या उईके जिल्हा संघटन सचिव महिला राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी नगरसेविका, मीनल चिमूरकर महिला शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँँग्रेस पार्टी गडचिरोली, आरती कोल्हे निरीक्षक महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चामोर्शी, सुषमा येवले, रेखा सहारे, तसेच अन्य डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.