डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव येथील स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनची नवीन कार्यकारिणी गठित

112

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव येथील स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. त्यात सन २०२२-२३ करिता स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळाची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष म्हणून निकिता चंद्रशाही सडमेक यांची तर उपाध्यक्षपदी शीतल विजय पदा, वनश्री आत्माराम दाजगाये, सचिव विभा रवींद्र निकुरे, सहसचिव व्टिंकल प्रकाश सयाम, कोषाध्यक्ष प्राची मनोज नंदेश्वर, सहकोषाध्यक्ष प्रणाली तुलावी, सांस्कृतिक सचिव आचल पंडीत मेश्राम, कार्यकारिणी सदस्य शीतल संजय हुमणे, संध्या लोहबरे, पायल दौलत मडावी, पूनम नामदेव वट्टी, दिव्यानी रुपराज वाकोडे यांची निवड करण्यात आली आहे.