तेली समाजातील सर्व घटकांनी संघटित होऊन सामाज एकतेची ताकद दाखवावी : माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

106

– श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आरमोरी येथे तेली समाज मेळावा

– जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात तेली समाज मोठ्या संख्येने आहे. हा समाज विविध जाती, पोटजातीमध्ये विखुरलेला आहे. तेली समाजातील सर्व घटक एकत्र आल्याशिवाय समाजाच्या समस्या सुटणार नाही. त्यामुळे तेली समाजातील सर्व घटकांनी संघटित होवुन एकतेचे दर्शन घडवावे आणि समाजाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त तेली समाज मेळावा तसेच वधु-वर परिचय मेळावा, जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व रक्तदान शिबिराचे आयोजन संताजी ग्राउंड कोसा विकास केंद्रा जवळ, वडसा रोड आरमोरी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून तेली समाज बांधवांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना योगीताताई पिपरे बोलत होत्या.
मेळाव्याला अध्यक्ष म्हणून किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवनजी खोब्रागडे उपस्थित होते. उद्घाटन महाराष्ट्र तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी फंड, जि. प.अध्यक्ष योगीताताई भांडेकर यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रामोदजी पिपरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रभाकरजी वासेकर,,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे, प्राचार्य पी. आर. आकरे, मुखरूजी खोब्रागडे, भाष्करराव बोडणे, भैयाजी सोमनकर, परसरामजी टिकले, डॉ. संजय सुपारे, विनोद बावनकर, दामजी नैताम, भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, क्षीरसागर मॅडम, जवंजाळकर मॅडम, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मेळाव्याला मोठ्या संख्येने तेलिसमाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदिप चापले यांनी केले. तर आभार रवींद्र वासेकर यांनी मानले.
यावेळी जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे आयोजन श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरीचे अध्यक्ष बुद्धाजी किरमे, उपाध्यक्ष रामभाऊ कुर्झेकर, सचिव देविदास नैताम, सहसचिव तुळशीरामजी चिलबुले, कोषाध्यक्ष विवेक घाटूरकर, द्वारकाप्रसाद सातपुते, शंकरराव बावनकर, महादेव भांडेकर, दिपक निंबकर, गजानन चिळगे, रविंद्र सोमनकर, आकाश चिलबुले, विलास चिलबुले, प्रतिभा जुवारे, हिराबाई कामडी, सुरेखा भांडेकर व श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळचे सदस्य यांनी केले.