Home गडचिरोली सामाजिक कार्यकर्ते धर्मानंद मेश्राम यांचा सत्कार

सामाजिक कार्यकर्ते धर्मानंद मेश्राम यांचा सत्कार

171

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील इंदिरानगर वार्डात १२ ऑक्टोबर २०२४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख मागदर्शक म्हणून उपस्थित होते.

धर्मानंद मेश्राम हे शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत होते व ते नियत वयोमनानुसार सेवानिवृत्त झाले. धर्मानंद मेश्राम पदावर कार्यरत असताना त्यांनी सचोटीने व इमानदारी ने आपले कर्तव्य पार पाडले. त्यासोबतचे त्यांचे बुद्ध धम्माचे प्रचार व प्रसाराचे कार्य अविरत सुरू आहे. त्यांच्या या सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगरतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश भानारकर, सचिव सचिन पाटील, लालाजी वालदे, अरविंद साखरे, वृषाल करवाडे, पंढरी भानारकर, स्वप्नील उंदिरवाडे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!