Home गडचिरोली लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना हेडरी येथे १०० व्या जन्मलेल्या कन्येचे स्वागत

लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना हेडरी येथे १०० व्या जन्मलेल्या कन्येचे स्वागत

82

– दवाखान्यात डिलिव्हरी झालेल्या सर्व महिलांना लॉयड्सचे एमडी प्रभाकरण यांच्या हस्ते बेबी किड्स देऊन केला सत्कार

– शंभर डिलिव्हरीकरिता योगदान देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे केले स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२४ ला हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना चालू झाल्यापासून आत्तापर्यंत १०० महिलांच्या डिलिव्हरी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यात. त्या निमित्याने १०० व्या जन्मलेल्या कन्येचे लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना हेडरीच्या वतीने लॉयड्सचे एमडी श्री प्रभाकरण यांच्या हस्ते चांदीची नानी देवून व बेबी किट देऊन स्वागत करण्यात आले. सोबतच दवाखान्यातमध्ये डिलिव्हरी झालेल्या सर्व महिलांना बेबी किड्स देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दवाखान्यात शंभर डिलिव्हरीकरिता योगदान दिलेल्या डॉ. प्रीती बुरीवार, डॉ. स्वाती रेड्डी, डॉ. उमेश उत्तरवार, डॉ. चेतन बुरीवार यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. सोबतच तीनही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंचव उपस्थित गाव पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. पुरसलगोंदीचे सरपंच अरुणाताई सडमेक, ग्रा. पं. नागुलवाडीचे सरपंच नेवलुजी पाटील गावडे, ग्रा. पं. नागुलवाडीचे उपसरपंच राजुभाऊ तिम्मा, ग्रा. पं. तोंडसाचे उपसरपंच प्रशांतजी आत्राम, साई कुमार, बलराम सोमनानी, शितल सोमनानी, संजय चांगलानी, सुनील दौंड PSI पोलिस स्टेशन हेडरी, डॉ. गोपाल रॉय, डॉ. चेतन बुरीवार, डॉ. प्रिती बुरीवार, कटिया तेलामी माजी उपसरपंच हेडरी, कल्पना अलाम माजी सरपंच सुरजागड, झुरू मासू गोटा गाव पाटील बोटमेटा, देवाजी पाटील कवडो गाव पाटील हेडरी, केरकेट्टा मॅडम अंगणवाडी सेविका मंगेर, गोसुजी हिचामी गाव पाटील मंगेर, लचुजी पा. हेडो गाव पाटील हालूर, फबीयानुस खलको प्रतिष्ठित नागरिक पाली टोला, साधू गुंडरु गाव पाटील बांडे, मंगू कलमोटी प्रतिष्ठित नागरिक हेडरी, झुरू कवडो नागरिक हेडरी, अशोक हिचामी प्रतिष्ठित नागरिक हेडरी, बाजी गुंडरु प्रतिष्ठित नागरिक बांडे, रामजी गुंडरु प्रतिष्ठित नागरिक बांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. समस्त कार्यक्रमाला ग्रामस्थांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

error: Content is protected !!