महाशिवरात्रीनिमित्त आ. डॉ. देवराव होळी यांनी केली सपत्नीक मार्कंडा देवस्थान येथे महापूजा

123

– विदर्भातील भाविक भक्तांना दिल्या महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी व त्यांची सहचारिणी सौ. बिनाताई होळी यांनी दरवर्षीप्रमाणे आज पहाटे मार्कंडा देवस्थान येथे महापूजा केली. यावेळी भाजपाचे जि. प.  कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गजानन भांडेकर व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. होळी यांनी देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्यासोबत दौरा करून तयारीची पाहणी केली व उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना निर्देश दिले व महाशिवरात्रीनिमित्त तमाम विदर्भातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिले.