– वसा येथील कोलांडीनाला बंधारा बांधकामातील 47 लोखंडी प्लेट्स (पल्ले) गेल्या होत्या चोरीस
– दोन गुन्ह्यातील 2 लाख 35 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : 26 नोव्हेंबर 2024 रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा वसा, ता. जि. गडचिरोली (कोलांडी नाला) येथील बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे 17 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून 500 मीटर अंतरावरील 30 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) अंदाजे किंमत 2 लाख 35 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. त्यावरुन पोस्टे आरमोरी येथे अनुक्रमे अपराध क्रमांक 382/2024 कलम 303 (2) भा.न्या.सं. व अपराध क्रमांक 383/2024 कलम 303 (2) अन्वये गुन्ह्रांची नोंद करण्यात आली होती.
नमुद दोन्ही गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे पोलीस स्टेशन आरमोरी यांनी सुरु केला असता, नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अशाच प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशन वरुड जि. अमरावती येथे झालेला असून सदर गुन्ह्रामधील आरोपी अटकेत आहेत, अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन वरुड, जि. अमरावती यांच्याशी संपर्क करून आरोपी नामे कुलदिपसिंग दर्शनसिंग जुणी, वय 27 वर्ष, रा. बिडगाव चेरी कंपनीजवळ, नागपूर ता. व जि. नागपूर याला ताब्यात घेवून कौशल्यपुर्वक तपास केला असता, नमुद आरोपीने मौजा वसा ता. जि. गडचिरोली येथील कोलांडी नाल्या बंधायातील दोन्ही ठिकाणांवरील लोखंडी प्लेट्स (पल्ले) चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीकडुन चोरी केलेला मुद्देमाल 1) 2.05 मी लांबी व 0.5 मी. रुंदी असणारे सिल्वर रंगाचे एकुण 30 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) प्रति प्लेट (पल्ला) वजन अंदाजे 100 कि.ग्रॅ. असून प्रति प्लेट (पल्ला) जु.वा.अं.कि. 5000/- रु. एकुण 1,50,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल. 2) 2.15 मी. लांबी व 0.5 मी. रुंदी असणारे सिल्वर रंगाचे एकुण 17 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) प्रति प्लेट (पल्ला) वजन अंदाजे 100 कि.ग्रॅ. असून प्रति प्लेट् (पल्ला) जु.वा.अं.कि. 5000/- रु एकुण 85,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल, असा एकुण 2,35,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 30/12/2024 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप, पोलीस स्टेशन आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, पोहवा./2540 विशाल केदार, पोअं /3378 सुरेश तांगडे, पोअं/4371 हंसराज धस सर्व पोलीस स्टेशन आरमोरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.







