विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : तालुकास्तरीय शालेय बाल क्रिडा व कला संमेलनाचे गुरवळा येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील आलेल्या विविध जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल रोप, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.







