माजी जि. प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या फळवाटप कार्यक्रम

195

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा कुरूड – विसापूर क्षेत्राच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपा महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षा योगिताताई मधुकरजी भांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, 19 फेब्रुवारी रोजी चामोर्शी तालुक्यातील आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच कुरूड – विसापूर जिल्हा परिषद क्षेत्रात वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जनतेनेे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.