गडचिरोली तालुका महिला काँग्रेसची सभा संपन्न

89

– नारी शक्तींच्या सन्मानार्थ महिलांंना बांगड्या भरून केला सन्मान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ‘भारतीय नारी हि देशाचि भरारी’ असून सामाजिक व राष्ट्रीय विकसात नारी शक्तीचे अत्यंत महत्त्वाचे योगदान असते. भारतीय नारी समाज सुधारणेची उपजत शक्ती असून त्या उपजत शक्तीला जागरूत करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांंच्या आदेशानुसार व गडचिरोली जिल्हा महिला काँँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा रूपालीताई पंदिलवार याच्या सूचनेनुसार आज, १२ फेेब्रुवारी २०२२ ला कल्पनाताई नंदेश्र्वर यांंच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली तालुका महिला काँग्रेसची सभा जिल्हा काँँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात येऊन नारी शक्तींच्या सन्मानार्थ उपस्थित महिलांंना बांगड्या भरून सन्मान करण्यात आला.
नारी शक्ती सन्मान कार्यक्रमास गडचिरोली तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पनाताई नंदेेश्वर, जिल्हा उपाध्यक्षा पोर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, आरती कंगाले, आशाताई मेश्राम, निताताई वडेट्टीवार, सुमन उंदिरवाडे, दिपा माळवणकर, अहित्या शहारे, शशिकला सहारे, संघमिञा राजवाडे, अर्चना चन्नावार, नलिनी शिन्दे, भारती मडावी यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.