गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांकरिता महामेळावा संपन्न

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयात उद्योगधंद्यांंचा अभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातुनच त्यांची आर्थिक समृध्दी व्हावी या हेतुने उद्यास आलेल्या पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा), गडचिरोली, AAIMS Protection Service Pvt. Lmt. Hyderabad, BOI STAR RSETI, Gadchiroli,अॅक्सिस बँक शाखा, गडचिरोली, आदर्शमित्र मंडळ पुणे व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अंमलबजावणी संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु), लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलीस संकुल परिसरातील ‘एकलव्य सभागृह’ येथे महामेळावा 27 जानेवारी 2022 रोजी पार पडला.

सदर महामेळाव्यात गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील युवक-युवतींनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवली. महामेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीओआय स्टार आरसेटी च्या माध्यमातून शिवणकलेचे प्रशिक्षण दिलेल्या 35 युवतींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र, सोनापुर यांच्या समन्वयातुन दि. 24.01.2022 ते दि. 27.01.2022 या कालावधीत बदक पालनाचे प्रशिक्षण दिलेल्या 51 प्रशिक्षणाथ्र्याना प्रत्येकी 10 बदकाची पिल्ले, बदक पालन करण्यास उपयोगात येणारे भांडे, खाद्य वाटप करण्यात आले. AAIMS Protection Service Pvt. Lmt. Hyderabad यांचे माध्यमातुन सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळालेल्या 60 युवकांना नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आदर्शमित्र मंडळ पुणे व जिल्हा दिव्यांग पुनर्वसनकेंद्र अंमलबजावणी संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु), लातुर यांचे माध्यमातून 25 दिव्यांग व्यक्तींना व्हिलचेअर वाटप करण्यात आल्या. अँँक्सीस बँक शाखा, गडचिरोली यांचे माध्यमातून व्हिएलईचे प्रशिक्षण घेतलेल्या 46 युवकांना व्हिएलई प्रमाणपत्र व कॉमन सÐव्हस सेेंंटर (सिएससी) प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 38 आत्मसमर्पित नक्षल कुटुंबियांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्यकार्ड वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे 3 आत्मसमर्पित नक्षल कुटुंबियांना घरकुल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
गडचिरोली पोलीस प्रशासनाद्वारे आजपर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 413, नर्सिंग असिस्टंट 1143, हॉस्पीटॅलीटी 296, ऑटोमोबाईल 254, इलेक्ट्रीशिअन 140, प्लंम्बींग 27, वेल्डींग 33, जनरल डयुर्टीं असिस्टंट 38, फील्ड ऑफीसर 11 तसेच व्हीएलई 45 असे एकुण 2400 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे बीओआय आरसेटी व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांचे सहकार्याने ब्युटीपॉर्लर 70, मत्स्यपालन 60, कुक्कुटपालन 343, बदक पालन 101, शेळीपालन 67, लेडीज टेलर 35, फोटोग्रॉफी 35, टु व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण 34, फास्ट फुड 35, पापड लोणचे 30, मधुमक्षिका पालन 32, भाजीपाला लागवड 326, टु/फोर व्हीलर प्रशिक्षण 370 व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 580 अशा प्रकारे एकुण 2118 युवक/युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर महामेळावा शंभुराजे देसाई गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, संदीप पाटील पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परीक्षेत्र, अंकित गोयल पोलीस अधिक्षक गडचिरोली,  समीर शेख अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली,  सोमय मुंडे अपर पोलीस अधिक्षक (अभियान), अनुज तारे अपर पोलीस अधिक्षक अहेरी, संदीप क­हाळे प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली, चेतन वैदय संचालक बीओआय स्टार आरसेटी गडचिरोली, राजीवकुमार सर्कल हेड नागपुर विभाग, अजित श्रीवास्तव क्लस्टर हेड, राकेश वल्लालवार ब्राँच मॅनेजर अँँक्सीस बँक शाखा गडचिरोली, मल्लेश यादव संचालक AAIMS Protection Service Pvt. Lmt. Hyderabad, सुरेश पाटील जिल्हा दिव्यांग पुनर्वसनकेंद्र अंमलबजावणी संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) लातुर यांचे उपस्थितीत घेण्यात पार पाडण्यात आला.
सदर महामेळावा यशस्वी होणेकरीता गडचिरोली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमके त्याचप्रमाणे नागरीकृती शाखेतील प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले.