शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाघाच्या हल्ल्यात बैल गमावलेल्या शेतकऱ्यांंना शिवसेनेने दिला मदतीचा हात

109

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली वनविभागात गेल्या वर्षभरापासुन वाघाने धुमाकूळ माजविला आहे. अनेक नागरिकांचा व पाळीव जनावरांंचा जीव घेतला आहे. धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम बोरी येथील 2 शेतकऱ्यांच्या बैलांंना वाघाने ठार मारले. त्यामुळे शेती कशी करावी या चिंतेत सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज साजरी करण्यात आली. जयंतीदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या समाजसेवेचा वसा जोपासत शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या शिवसैनिकांंसह बोरी येथे जावून वाघाच्या हल्ल्यात बैल दगाविल्याने संकटात सापडलेले शेतकरी पांडुरंगजी दाजगाये आणि यशवंत लकुड़वाहे यांना आर्थिक मदत देवून मोठा आधार दिला. याप्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यानी बोरी गावातील नागरिकांशी सवांद साधूून गावतील समस्या जाणून घेतल्या. गावकाऱ्यांशी सवांद साधताना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, कठीण प्रसंगात व संकटात सापडलेल्यांंना आधार देणे हा शिवसेनेचा वसा आहे. शिवसेना ही गरजवंतांच्या मदतीसाठी धावून जानारी सेना आहे. शिवसेनेचा मी कट्टर शिवसैनिक म्हणून तसेेच मा. बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी घालून दिलेली शिकवण आणि त्यांच्या कार्याचा आदर्श जोपासून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. आपल्या गावातील कोणत्याही समस्या असल्यास त्या शासन व प्रशासनाकड़े मांडून सोडविण्याचा प्रयत्न करिन, अशी ग्वाही शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिली गांवकाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानताना गरिबांंच्या मदतीला फक्त शिवसेनाच धावून येवू शकते, असे भावउद्धगार बोरी वासियांनी काढले. याप्रसंगी यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, राहूल सोरते, पांडुरंग दाजगाये, लालाजी बह्याळ, हरबाजी दाजगाये, हेमंत बह्याळ, यशवंत लकुड़वाहे, विलास दाजगाये, कुमेश बह्याळ, जनक मारगाये, संजय दाजगाये, येनिदास लाकुड़वाहे, देवेंद्र दाजगाये, रामदास बह्याळ, सोहम दाजगाये, भजन करमाकर, केशव बह्याळ, सौरभ दाजगाये, निरंजन लोहबरे, विठ्ठल कन्नाक्के, नितीन दाजगाये, रामचंद्र कन्नाके, उद्वव दाजगाये, निखिल बह्याळ, मोहन करमाकर, दिनेश लोहबरे, कैलाश नामरपुरे, भजनदास लोहंबरे आदी उपस्थित होते.