– खा. अशोकजी नेते यांंच्यातर्फे दुखवट्यात असलेल्या 450 एस. टी. कर्मचाऱ्यांंना अन्नधान्य वाटप
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आपल्या महाराष्ट्रापेक्षा लहान राज्याने परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केले. पुरोगामी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार एस. टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करुन 96 हजार एस. टी. कर्मचारी यांंना न्याय द्यावे, अशी मागणी भाजपा जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खा.अशोकजी नेतेे यांंनी केली.
गडचिरोली डेपोतील 450 एस. टि. कर्मचारी यांंना अन्नधान्य किट वितरण व दुखवट्यात असलेल्या एस. टि. कर्मचारी यांची भेटीदरम्यान ते बोलत होते.
यावेळी भाजपा STM महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम म्हणाले, 32 एस. टि. कर्मचारी विवंचना, वेतन कमीमुळे आत्महत्या केली. त्यानंतर 3 महिन्यांंपासून सुरू असलेल्या दुखवटादरम्यान हा आकडा 85 वर पोहचला. शिवरायांच्या, फुले, शााहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात या कामगारांच्या आत्महत्या महाविकास आघाडी सरकारला भूूषणावह वाटतो म्हणून राज्य सरकार निर्णय घेत नाही का? मा. उच्च न्यायालयाकडून निश्चितपणे आपल्या कष्टकऱ्यांना न्याय मिळेल.
दिल्लीवरुन आलेले संसदीय संकुल विकास परियोजना राष्ट्रीय संयोजक अनिलजी वडसंघकर, खा. अशोकजी नेते, प्रकाशजी गेडाम, भाजपा नेत्या प्रतिभाताई चौधरी, STM प्रदेश मीडिया प्रमुख अक्षयजी उईके यांच्या हस्ते 450 एस. टि. कर्मचारी यांंना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी गडचिरोली डेपोतील महिला, पुरुष एस. टि. कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
मा. नाना पाटेकर, मा. मकरंद अनासपुरे यांच्या नाम संघटनेने, गावकरी मंडळी, पत्रकार, वकील मंडळी, भारतीय जनता पक्ष, विविध पक्ष अशा अनेकांंनी एस. टि. कर्मचारी यांच्या दुखवटा आंदोलनला सहकार्य व पांठिबा दिला आहे, असे कर्मचारी पेटकर यावेळी म्हणाले.