संसदीय संकूल विकास परियोजनाच्या माध्यमातून गावांचा सर्वकश विकास करणार : खा. अशोकजी नेते

144

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गावांचा विकास, स्थलांतर रोकणे, केन्द्र व राज्याच्या सर्व योजना गावात पोहचवून गावांचा सर्वकश विकास करण्याकरिता संसदीय संकूल विकास परियोजनेच्या माध्यमातून चातगाव व परिसरात अविकसीत 25 गावांचा विकास करणार आहोत. आपला गाव आपला विकास करण्याकरिता आपण सहकार्य करावे, असे आवाहन भाजपा STM राष्ट्रीय महामंत्री खा. अशोकजी नेते यांंनी केले.
संसदीय संकूल विकास परियोजनाच्या माध्यमातून चातगाव येथील 25 गावातील प्रमुख समाज कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून दिल्लीवरुन या बैठकीकरिता आलेले संसदीय संकुल परियोजना राष्ट्रीय संयोजक मा. अनिलजी वडसंघकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी मा. अनिलजी वडसंघकर म्हणाले, या परियोजनेच्या माध्यमातून गावांचा विकास गावातील जनतेच्या समस्या समजुन घेउन करणार आहोत. म्हणून मी आपल्या समस्या समजून घेण्यासाठी ग्रामदर्शन प्रवास करीत आहे. प्रास्ताविक भाषण संसदीय संकुल विकास परीयोजना जिल्हा संयोजक डॉ. भारतजी खटी यांनी केले. यावेळी भाजपा STM महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, संसदीय संकुल विकास परियोजना गडचिरोली संयोजक अक्षयजी उईके, चातगावचे सरपंच गोपालजी उईके उपस्थित होते.