शहरातील प्रभाग क्र. १२ मध्ये विकास कामांंवर भर : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

91

– गोकुलनगर येथे सिमेंट – काँक्रीट बंदिस्त नाली बांधकामाचे भूमिपूजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास झालेला असुन प्रभाग क्र. १२ मध्ये सुध्दा विकासकामांवर भर देण्यात आला असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.
नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १२ मधील गोकुलनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत रोहनकर ते देवा वाढई यांच्या घरापर्यंत सिमेंट- काँक्रीट बंदिस्त नाली बांधकामाचे भूमिपूजन मा. नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर नाली बांधकामाची अंदाजित रक्कम १६ लाख ८१ हजार ४९५ रुपये एवढी असून १२० मीटर लांबीचा बांधकाम आहे.
पुढे बोलताना मा. नगराध्यक्ष योगीताताई पिपरे म्हणाल्या की, मागील पाच वर्षांंत या प्रभागामध्ये दलीतवस्ती सुधार योजना अंतर्गत १.५ कोटींचे विविध विकासकामे, नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत ४.५ कोटी रुपयांचे सिमेंट – काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, नाली कव्हर, रस्ता खडीकरण करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत ३.१९ कोटींचे विविध विकासकामे, वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी योजना अंतर्गत ३.५२ कोटी रुपयांचे खुल्या जागेचे सौन्दर्यीकरण, रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, सिमेंट – काँक्रीट रस्ता, नाली बांधकाम, ५० लक्ष रुपयांचे शिवाजी कनिष्ट महाविद्यालय ते पाण्याचा टाकीला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, १.५० कोटी रुपयांचे तलावामागील मुख्य रस्त्याचे सिमेंट- काँक्रीट बांधकाम, ३.१८ कोटी नगरोत्थान महाअभियांन अंतर्गत विविध विकासकामे तसेच कोट्यवधी रुपयांचे विकासकामे या प्रभागामध्ये करण्यात आले असल्याचे प्रतिपादनही मा. नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी यावेळी केले.
भूमिपूजन कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, नगरसेवक नितीन उंदिरवाडे, नगरसेविका पूजा बोबाटे, वासुदेव बट्टे, रामन्नाजी बोण्डकूलवार, प्रकाश कम्पलवार, एन. पी. सरदारे, रशीद शेख, कंत्राटदार मधुकर भांडेकर यांच्यासह वार्डातील नागरिक उपस्थित होते.