अतिदुर्गम भागातील खेळाडूंनाही या स्पर्धांंतून पुढे येण्यासाठी मोठी संधी : आमदार डॉ. देवरावजी होळी

134

– मासानदी (पेंढरी) येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

– अतिदुर्गम भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या स्पर्धा आयोजकांचे केले अभिनंदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील खेळाडुुंंना व्हॉलीबॉल, कबड्डी यासारख्या स्पर्धांच्या माध्यमातून पुढे येण्याची मोठी संधी असून आपल्या चांगल्या खेळाच्या प्रदर्शनावर भविष्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळू शकते, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मासानदी (पेंढरी) येथील कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले की, अतिदुर्गम भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून येथील खेळाडूंना पुढे येण्याची संधी संधी निर्माण करून देणाऱ्या स्पर्धा आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्यात जिंकण्याची ओढ निर्माण होऊन आपले वैयक्तिक व सामूहिक कौशल्य दाखविण्याची संधी या खेळाडूंना मिळत आहे. आपल्या उत्तम कौशल्याच्या आधारावर चांगला खेळाडू निर्माण होऊन दाखवण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. आपल्या उत्तम खेळाच्या प्रदर्शनावर आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून आपल्या जिल्ह्याचे नाव मोठे करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी खेळाडूंना केले.