काँग्रेस विचारधारेवर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांचा व कार्यकर्त्यांचा विजय : महेंद्र ब्राम्हणवाडे

113

– काँग्रेस जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांना चित करून सर्वाधिक जागा मिळवत काँग्रेस जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांंसोबत काँग्रेस विचारधारेवर व पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व मतदार आणि सामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. जिल्ह्यात भाजपचे 1 खासदार, 2 आमदार असून सुद्धा काँग्रेसने मोठे यश संपादन करत जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. आता नव्या पर्वाला सुरुवात झालेली असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकात देखील काँग्रेस जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरेल व जिल्हा परिषद सोबतच सर्व ठिकाणी काँग्रेसची सत्ता बसेल, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केला आहे.