एनीमीया आजाराने ग्रस्त एका व्यक्तीचा कोविडने मृत्यू

126

– आज 88 कोरोनामुक्त, नवे 221 कोरोनाबाधित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 1027 कोरोना तपासण्यांपैकी 221 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 88 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32592 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30752 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1088 झाली आहे. आज नविन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील 40 वर्षीय पुरुषाचा (एनीमीया आजाराने ग्रस्त) समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 752 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.35 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.34 टक्के तर मृत्यू दर 2.31 टक्के झाला आहे.

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 88, अहेरी तालुक्यातील 3, आरमोरी तालुक्यातील 14, भामरागड तालुक्यातील 4, चामोर्शी तालुक्यातील 36, धानोरा तालुक्यातील 11, एटापल्ली तालुक्यातील 4, मुलचेरा तालुक्यातील 7, कोरची तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 25, सिरोंचा तालुक्यातील 4, आणि वडसा तालुक्यातील 24 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 88 रुग्णांंमध्ये गडचिरोली तालुक्यातील 47, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी तालुक्यातील 2, भामरागड तालुक्यातील 4, एटापल्ली तालुक्यातील 3, सिरोंचा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 5 आणि वडसा तालुक्यातील 9 जणांंचा समावेश आहे.